" झुंजार " युवक नेतृत्व - युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दिनेश बागल वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा

mhcitynews
0

तुळजापूर तालुक्यातील बदलत्या राजकीय समीकरणांत भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चात एक नव्या ऊर्जेचं, संघटनक्षम आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून तालुकाध्यक्ष दिनेश बागल यांचं नाव ठळकपणे पुढे येत आहे.


आमदार राणा जगजितसिंह पाटील व माजी सभापती सचिन पाटील यांच्या प्रेरणेने समाजकारणात उतरलेल्या बागल यांनी राजकारणाकडे सत्तेसाठी नव्हे, तर सेवेच्या माध्यमातून परिवर्तनासाठी पाहिलं.

ग्रामीण भागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा — पाणी, रस्ता, घरकुल, शिक्षण, आरोग्य — यासाठी सातत्याने लढा देत त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली.


सुरुवातीला “झुंजार प्रतिष्ठान” या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य सुरू केले. शैक्षणिक मदत, युवक मार्गदर्शन, आणि सामाजिक उपक्रमांद्वारे त्यांनी सामान्य जनतेचा विश्वास जिंकला.

यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकारणात प्रवेश करत त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी उमेदवारी दिली.

ही निवडणूक त्यांच्यासाठी केवळ राजकीय स्पर्धा नव्हती, तर गावकऱ्यांचा विश्वास आणि कार्याचा जनआढावा घेण्याची एक मोठी परीक्षा होती. या निवडणुकीतून त्यांनी स्थानिक प्रश्न, लोकभावना आणि संघटनशक्ती यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला — जो त्यांच्या पुढील राजकीय प्रवासाचा पाया ठरला.


भाजपमध्ये एक साधा कार्यकर्ता म्हणून सुरुवात करत त्यांनी संघटनेच्या पातळी-पातळीवर काम केलं. युवा मोर्चा विधानसभा जिल्हा संयोजक ते तालुकाध्यक्ष या पदापर्यंतचा प्रवास त्यांनी कर्तृत्व, संयम आणि संघटन कौशल्य यांच्या जोरावर केला.


त्यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाने विविध उपक्रम प्रभावीपणे राबवले — डिजिटल सभासद नोंदणी, मतदार जनजागृती, तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पक्षाची ठोस भूमिका मांडण्याचे काम त्यांनी पुढाकाराने केलं.


आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, हा दिवस एक नव्या पिढीच्या नेतृत्वाच्या उभारणीचं प्रतीक ठरत आहे. ग्रामीण भागातील अशा या झुंजार, विचारशील आणि जनाधार असलेल्या युवा नेत्यांला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...


सिद्दीक पटेल

उपसंपादक - दैनिक त्रिशक्ती

मुख्य संपादक - सा. गोल्ड वार्ता / सिटी न्यूज


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top