तुळजापूर | प्रतिनिधी
आगामी पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये महिला नेतृत्वाला संधी देण्याच्या चर्चेला वेग आला असून, सिंदफळ पंचायत समिती गणातून सौ. वैशाली सुनील बागल यांचे नाव इच्छुक उमेदवार म्हणून ठळकपणे पुढे आले आहे. महिला प्रश्नांची जाण, सामाजिक बांधिलकी आणि संयमी नेतृत्वशैलीमुळे त्या भाजपमधील विश्वासार्ह चेहरा मानल्या जात आहेत.
भाजप युवक मोर्चाच्या माध्यमातून संघटनात्मक कामाचा भक्कम अनुभव असलेले त्यांचे पुत्र दिनेश बागल यांचीही राजकीय भूमिका महत्त्वाची ठरत आहे. तालुका ते जिल्हा स्तरावर विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत त्यांनी पक्ष संघटना मजबूत करणे, युवकांना संघटित करणे तसेच विविध आंदोलनात्मक व सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यामुळे त्यांची अभ्यासू व काम करणारा युवक नेता अशी ओळख निर्माण झाली आहे.
युवक, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधणारे नेतृत्व म्हणून दिनेश बागल परिचित असून, पक्षाच्या कार्यक्रमांसह सामाजिक प्रश्नांवरही ते सातत्याने पुढाकार घेत आहेत. त्यामुळे जिल्हाभरात त्यांचा संपर्क व विश्वासाचा परीघ विस्तारत आहे.
पंचायत समिती सदस्य म्हणून संधी मिळाल्यास ग्रामविकास, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य, युवकांसाठी रोजगार व कौशल्य विकास या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचा स्पष्ट अजेंडा समोर ठेवण्यात आला आहे. “राजकारण हे सत्तेसाठी नव्हे, तर सेवेसाठी” अशी भूमिका ते ठामपणे मांडतात.
दरम्यान, भाजपमध्ये सध्या युवक आणि महिला नेतृत्वाला पुढे आणण्याबाबत सकारात्मक वातावरण असून, सौ. वैशाली सुनील बागल यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा कार्यकर्ते व नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे सिंदफळ पंचायत समिती गणातून भाजपचा अंतिम चेहरा कोण असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
