धाराशिवात 18 जुलैला भव्य जगन्नाथ रथ यात्रा

mhcitynews
0

 


धाराशीव प्रतिनिधी 

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ - इस्कॉन धाराशीवच्या वतीने शनिवार दि . 18 जुलै रोजी भव्य ' श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी 'रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे . दुपारी 2:00 वा. जिल्हाधिकारी मा . कीर्ती किरण पुजार व ॲड . गजानन चौगुले, जिल्हाध्यक्ष विश्व हिंदू परिषद यांच्या हस्ते रथ यात्रेला सुरुवात होईल . यावेळी श्रीमान कृष्ण भक्त प्रभूजी, श्रीमान विठ्ठलानंद प्रभूजी व श्रीमान यादवेंद्र प्रभूजी यांची विशेष उपस्थिती असणार आहे .

   रथ यात्रेस स्वयंवर मंगल कार्यालय येथून प्रारंभ होणार असून, आर . पी कॉलेज , पोष्ट ऑफिस, माऊली चौक, शिवाजी चौक, श्री विसर्जन विहीर मार्गे परत स्वयंवर मंगल कार्यालय येथे सांगता होईल .

      रथ यात्रेसाठी बीड, लातूर, सोलापूर येथून भक्त मोठ्या संख्येने येणार असून धाराशीवसह पंचक्रोशीतील भाविकांनी या रथ यात्रेत सहभागी होऊन आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन इस्कॉन धाराशीवचे श्रीमान प्रजापती विष्णुदास यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top