जन्म-मृत्यू नोंदींचे प्रस्ताव दोन वर्षांपासून नळदुर्ग नगर परिषदेत प्रलंबित; नागरिकांची मोठी गैरसोय
नळदुर्ग प्रतिनिधी
जन्म व मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नागरिकांवर लादण्यात आलेल्या जाचक अटी तात्काळ रद्द करून प्रलंबित नोंदींचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी तुळजापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. अरविंद बेडगे यांनी केली आहे. अन्यथा संविधानाच्या चौकटीत लोकशाही मार्गाने आंदोलन व उपोषण छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
राज्यात जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना अनेक प्रकारची कागदपत्रे सादर करण्याची सक्ती करण्यात येत आहे. या अटी पूर्ण करणे अनेकांसाठी अशक्य असल्याने नागरिकांना तहसील कार्यालय, अप्पर तहसीलदार कार्यालय आणि नगर परिषद कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी हेळसांड होत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे ही ॲड बेडगे यांनी सांगितले.
ग्रामीण भागात अनेक प्रसूती घरात, शेतात किंवा इतर ठिकाणी झालेल्या आहेत. अशा नागरिकांकडे शासनाने मागितलेली सर्व कागदपत्रे उपलब्ध असणे शक्य नसते. तरीही अंगणवाडी सेविकेचे प्रमाणपत्र, रुग्णालयाची कागदपत्रे, लसीकरण नोंदी, शाळा सोडल्याचा दाखला, जमीन उतारा, खरेदीखत, आधार कार्ड, पॅन कार्ड, जॉब कार्ड, कर पावती, वीज बिल, वारस नोंदी, फेरफार उतारा, नोंदणीकृत दस्त, स्थानिक वृत्तपत्रातील जाहीर प्रसिद्धी, बँक किंवा पोस्ट खाते, विशेष कार्यकारी अधिकारी, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष, राजपत्रित अधिकारी यांचे दाखले व साक्षीदार आदी अनेक कागदपत्रांची मागणी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
ज्यांचा जन्म घरात, पाल्यात किंवा शेतात झाला आहे, त्यांनी एवढे पुरावे कुठुन गोळा करणार काही जरी झाले तरी जन्म आणि मृत्यूची नोंद कार्यालयात होणार नाही किंवा करून घेतली जाणार नाही असे मत कर्मचाऱ्याकडून येत असल्याने नागरिकात नाराजीचा सुर उमटत आहे
संपूर्ण दस्तावेज आमच्या कार्यालयात दाखल करा नाहीतर त्या कुठल्याही प्रकारची नोंद घेतली जाणार नाही आशा प्रकारचा भय तेथील स्थानिक पातळीवर कर्मचारी यांनी घातला आहे त्यामुळे नागरिकात संतापाची लाट उसळली आहे गेले दोन वर्षापासून जन्म नोंद व मृत्यू नोंदीची पाहिली तुळजापूर तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडे प्रलंबित होत्या परंतु तेथील पाहिली नळदुर्ग अपर तहसील कार्यालयात दाखल झाल्या या कार्यातून नगरपरिषद कार्यामध्ये सादर करण्यात आल्या नगरपरिषदेने काही फॉर्मेट भरून ही फाईल परत अपर तहसील कार्याला दाखल करण्यात आल्या आहेत परंतु तेथील कर्मचाऱ्याने परत नगरपरिषदे मध्ये दाखल करण्यात आल्या आहेत हा खेळ वारंवार कुठवर चालणार याला जनता वैतागली आहे नागरिकांची होत आसलेली हेळसांड कधी बंद होणार प्रशासनाने जन्म मृत्यूची नोंदणी संदर्भात जास्तीचा घातल्याने संबंधित अर्जदाराला जन्म व मृत्यूची नोंद मिळत नसल्याने खंत व्यक्त केली जात आहे अगर हा बाजार नाही थांबला आणि नागरिकांना कुठल्याही प्रकारची हेळसांड न करता मोजक्या कागदपत्रांमध्ये त्यांच्या जन्माची व मृत्यूची नोंद नाही झाल्यास तुळजापूर राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने लोकशाही पद्धतीने संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही आंदोलन करण्यात येईल असा खडीसावा तुळजापूर तालुक्याचे एक अभ्यासू नेतृत्व एक व्यक्तिमत्व म्हणून उद्या असलेले ॲड अरविंद बेडगे यांनी केले आहे
