![]() |
| संग्रहीत |
तुळजापूर प्रतिनिधी
शेताच्या तारेच्या कुंपनात विद्युत प्रवाह सोडल्याने जीवीत हानी होण्याची शक्यता असल्याचे माहित असुनसुध्दा बुक्कनवाडी, ता. उस्मानाबाद येथील- सुर्यकांत गलांडे यांनी बुक्कनवाडी शिवारातील त्यांच्या शेताच्या तारेच्या कुंपनात विद्युत प्रवास सोडल्याने दि. दि. 13.12.2022 रोजी 09.00 वा. सु. गावकरी- बालाजी अनिल शिंदे हा 16 वर्षीय मुलगा त्या कुंपनाच्या तारेस चिकटून विद्युत धक्क्याने मयत झाला. अशा मजकुराच्या मयताचे पिता- अनिल लगमन शिंदे यांनी दि. 13.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 304 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
.jpeg)