![]() |
| संग्रहीत |
तुळजापूर प्रतिनिधी
बाभळगाव, ता. तुळजापूर येथील- चंद्रकांत दत्तात्रय धनवडे यांच्या शेत गट क्र. 38/2 मधील 3 हेक्टर 61 आर क्षेत्राचा 2020 सालचा पिक विमा चंद्रकांत यांची आई- उमाबाई धनवडे यांच्या नावावर भरला होता. परंतू ग्रामस्थ- प्रगती बळीराम धनवडे यांनी नमूद क्षेत्रात त्यांची शेती जमीन नसताना त्यांनी सप्टेंबर- 2020 ते जानेवारी 2022 दरम्यान कागदपत्रात फेरफार करुन त्या शेत जमिनीचा स्वत:च्या नावावर पिकविमा भरुन उमाबाई धनवडे यांची फसवणूक केली. अशा मजकुराच्या चंद्रकांत धनवडे यांनी दि. 13.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 465, 471 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
.jpeg)