30 डिसेंबर पासून शाकंभरी नवरात्र प्रारंभ

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी

श्री तुळजाभवानी देवीची शाकंभरी नवरात्र महोत्सव 30 डिसेंबर पासून सुरुवात होणार असून तत्पूर्वी दिनांक 23 डिसेंबर रोजी सायंकाळी पंचामृत अभिषेक संपल्यानंतर श्री तुळजाभवानी देवीची मंचिका निद्रा चालू होईल.यानंतर पौष शु.०८ दि.३० डिसेंबर शुक्रवार रोजी पहाटे देवी सिंहासनावर विराजमान होईल. त्यानंतर पंचामृत पूजा घातली जाईल व दुपारी बारा वाजता गणेश विहिरात यावर्षी शाकंभरी नवरात्राचे मुख्य यजमान उपाध्य पुजारी श्रीराम प्रभाकरराव कुलकर्णी व सौ.सुखदा श्रीराम कुलकर्णी यांच्या हस्ते घटस्थापना होईल. त्यानंतर रात्रौ छबीना दि.०३ जानेवारी २०२३ मंगळवार रोजी सकाळी ७ वा.शाकंभरी नवरात्राचे मुख्य आकर्षण असलेले हजारो सुहासिनी आपणास तीर्थयातून कळस मध्ये जल घेऊन देवीच्या मंदिरात येतात व कळस मध्ये आणलेला जल देवीच्या चरणी अर्पण करतात यालाच "जलयात्रा"महोत्सव म्हणतात


दि.०४ जानेवारी रोजी सकाळी नित्येपचार पूजा व रात्रौ छबीन पौष शु.१४ दि.०५ गुरुवार अग्निस्थापना, यज्ञास आरंभ व रात्रौ छबीना पौष शु.१५ दि.०६ जानेवारी शुक्रवार पौर्णिमा,धुपारती,घटोत्थापन, पुर्णाहुती व रात्रौ छबीना पौष व.०१ दि.०७ जानेवारी शनिवार अन्नदान महाप्रसाद व रात्रौ छबीना निघेल अशा रीतीने शाकंभरी नवरात्राचे सांगता होईल.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top