श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात गणित दिन साजरा

mhcitynews
0


उस्मानाबाद प्रतिनिधी 

श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुवार (दि. २२) गणित दिन साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित विविध परीक्षा, सेमीनार मध्ये सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. इयत्ता ११ वी विज्ञान वर्गात थोर भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजम यांची जयंती गणित दिवस म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात  प्रतिमा पुजनाने करण्यात आली. यावेळी गणित दिना निमित्त महाविद्यालयात घेण्यात आलेल्या सेमिनार, सुत्र, प्रमेय लिखान आदी विविध परीक्षां मध्ये सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी प्राचार्य साहेबराव देशमुख, उप प्राचार्य संतोष घारगे, पर्यवेक्षक तानाजी हाजगुडे, जे. एस. पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.  


याप्रसंगी शितल चौरे, यश डोलारे, जयश्री सोमासे या विद्यार्थ्यांनी गणित दिना चे महत्व सांगितले. कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी आयान पठाण, दिव्या देशमाने, प्रतिक्षा येडके, जोगेश्वरी कुंभार, नेहा जाधव आदी विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभवी कुलकर्णी व सोनाली चौगुले या विद्यार्थ्यीनींनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रा. ज्योती शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाला इयत्ता ११ वी विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top