शेतजमीनीच्या वाटणीवरुन मारहाण ; गुन्हा दाखल

mhcitynews
0


उस्मानाबाद प्रतिनिधी 

मंगरुळ येथील- मधुकर रितापुरे, वय 55 वर्षे हे दि. 21.12.2022 रोजी 16.30 वा. सु. मंगरुळ शिवारातील शेतात होते. यावेळी भाऊबंद- प्रदिप रितापुरे यांसह गावातील नातेवाईक- सुनिता व शिवाजी माने, लक्ष्मीबाई माने यांनी शेतजमीनीच्या वाटणीवरुन मधूकर यांच्यासोबत वाद घालून त्यांना शिवीगाळ केली. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सध्या तुमच्या मागणीप्रमाणे वाटणी शक्य नसल्याचे मधुकर यांनी त्यांना सांगून समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मधुकर यांना लाथाबुक्क्यांनी, कोयता, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या मधुकर रितापुरे यांनी दि. 21.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोन पोलीस ठाणे येथे भा.दं.सं. कलम- 323, 326, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top