प्रतिनिधी सलमान मुल्ला
उस्मानाबाद जिल्ह्यातील 165 ग्रामपंचायतीसाठी तर कळंब तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीसाठी काल मतदान झाले. त्यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचाही समावेश आहे.
मतदान शांततेत पार पडले असून कळंब येथे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथे मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
या दरम्यान कळंबचे तहसीलदार मुस्तफा खोंदे यांनी असे सांगितले की मतमोजणीची सर्व तयारी झालेली आहे.
एकूण १६ टेबलद्वारे 3 राउंड होऊन मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मतमोजणी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण हे देखील देऊन झाले आहे.. मतपेटी देखील स्ट्रॉंग रूममध्ये पोलीस संरक्षणाखाली सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत.. उद्या सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
मतमोजणी केंद्रावर फक्त पत्रकार उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना देखील ओळखपत्र असल्याशिवाय घेतल्याशिवाय मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळणार नाही असे तहसीलदार मुस्तफा खोंदे यांनी सांगितले आहे.
