तुळजापुरात खाजगी सावकारकी धंद्याच्या मनमानी कारभारातून मारहाण

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी

फिर्यादी गणेश मोहन धनके यांनी सुनील गपाट यांच्याकडून हात उसने पैसे घेतले होते. या व्यवहारात धनके यांनी चेक दिला होता हा चेक न वाटल्याने यातील आरोपीने चेक न वाटल्याने फिर्यादी विरुद्ध कोर्ट केस दाखल केली होती. हा सर्व प्रकार न्यायप्रलंबित असताना देखील खाजगी सावकारकी अनुषंगातुन दिनांक दहा रोजी सकाळी 11 साडेअकरा बाराच्या दरम्यान गणेश मोहन धनके हे सोलापूर रोडवरील लक्ष्मी पेट्रोल पंप येथे पेट्रोल भरण्यासाठी गेले असता. अचानक तेथे आलेल्या सुनील गपाट यांनी आर्थिक व्यवहारातून शिवीगाळी करत गणेश धनके यांना मारहाण केली. तुला व तुझ्या घरच्यांना घरात घुसून मारीन अशी धमकी दिली. या मारहाणीत गणेश धनके हे गंभीरित्या जखमी झाले असून उपजिल्हा रुग्णालय येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. धनके यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस स्टेशन येथे कलम 323/ 504/ 506 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास एच. सी. 1338 राठोड हे करत आहेत.


सुनील गपाट यांच्याकडून एक लाख रुपये दहा टक्क्यांनी घेतले होते घेतलेल्या रकमेचे व्याज महिन्याच्या महिन्याला तीन वर्ष भरले. मुद्दलाची रक्कम थोडी थोडी करून देतो असे सांगितलेले असताना देखील दिलेल्या चेकवर तीन लाख रुपयांची रक्कम टाकून चेक बँकेत दिला पण माझी आर्थिक परिस्थिती नसल्याने सदरील चेक बॉन्स झाला चेकबॉन्स ची केस कोर्टात चालू  असताना देखील मला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी गपाट यांनी दिली भविष्यात मला आणि माझ्या कुटुंबीयांच्या जीवास सदरील व्यक्तीपासून धोका आहे

- गणेश धनके, सिंदफळ


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top