तुळजापूर प्रतिनिधी
लोकमंगल फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी चे नेते रोहन (दादा) देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापुरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. लोकमंगल मल्टीस्टेटचे नूतन संचालक श्री.सचिन आडगळे यांच्यामार्फत तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर जाधव, माजी नगरसेवक राहुल खपले, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेश सरचिटणीस आबासाहेब कापसे, नवनाथ जगताप, लोकमंगल मल्टीस्टेटच्या तुळजापूर शाखेचे शाखाधिकारी फजल सिद्दीकी, विनोद देवकर, शिवाजी कुंभार, पद्मसिंह भूमकर, प्रणव जेवळीकर, दत्ता कांबळे, लोहारा येथील लोकमंगल साखर कारखान्याचे ऊस पुरवठा अधिकारी दाभाडे व सुरवसे यांची उपस्थिती होती.
तुळजापूर तालुक्यातील कामठा येथील भाजपा कार्यकर्ते श्री. औदुंबर जमदाडे यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी कामठा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक व विद्यार्थ्यांची वर्ग उपस्थित होते.
