तुळजापूर प्रतिनिधी
सरपंचपदासह ग्रामपंचायत सदस्यत्वासाठीच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जाची छाननी ५ डिसेंबर राेजी हाेणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात १६६ ग्रामपंचायतीच्या १८ डिसेंबरला निवडणूका होत आहेत. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी नामनिर्देशन उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच व सदस्य पदासाठी उमेदवारांनी आपले शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल केले. निवडणुकीसाठी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची सोमवारी (दि.५) आज छाननी होत आहे. छाननीमध्ये कोणाकोणाचा अर्ज बाद होतो, तसेच कोण कोणांच्या अर्जावर आक्षेप घेणार याकडे गावपुढाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
बुधवारपर्यंत अर्ज मागे घेणार
उमेदवारी अर्ज ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ पर्यंत मागे घेता येणार आहे. मतदान १८ डिसेंबर, सकाळी ७.३० ते ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत करता येणार असून, मतमोजणी २० डिसेंबर राेजी हाेणार आहे.
.jpeg)