अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतिने विविध मागण्यासाठी लक्षणिक उपोषण

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

तुळजापूर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्या वतीने (दि.५) रोजी तहसील कार्यालय तुळजापूर समोर विविध मागण्या साठी लक्षणिक उपोषण करण्यात आले होते 


तुळजापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील रोजगार हमी  योजनेअंतर्गत मयत व्यक्तीच्या नावाने शासकीय बिल काढून शासनाची फसवणूक झालेली असून गुन्हे न दाखल झाल्यामुळे,  तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द येथील रोजगार हमी योजनेमध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाला असून याबाबत चौकशी करून गुन्हे दाखल न झाल्यामुळे, तुळजापूर शहरातील पेट्रोल पंप येथे सर्व सुविधा नसल्यामुळे त्यांचे परवाने रद्द करण्यासाठी तहसिलदार यांना वारंवार निवेदन देऊनही कारवाई होत नसल्यामुळे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांचे (दि.५) रोजी लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर तुळजापूर तहसिलचे तहसिलदार सौदागर तांदळे व तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांनी उपोषण ठिकाणी भेट देऊन पुढील १५ दिवसात दोषीवर चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे यांच्यावतिने सांगण्यात आले. त्यांनतर उपोषण स्थगित करण्यात आले आहे. 


या उपोषणास असंख्य कार्यकर्ते तसेच असंख्य नागरिकांनी पाठिंबा दिला. तरी या आंदोलनाला अखिल भारतीय भ्रष्टाचार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर हे उपस्थित होते. 


यावेळी तालुका अध्यक्ष गणेश भैय्या पाटील, तुळजापूर शहराध्यक्ष निखिल आप्पा अमृतराव, तालुका संघटक बालाजी जाधव, जिल्हाध्यक्ष आनंद भालेराव, प्रदेश सचिव चंद्रकांत गायकवाड, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शिंदे, कामगार विभाग तालुकाध्यक्ष श्रीशैल मुळे, तालुका कार्याध्यक्ष नेताजी शिंदे, तालुका संपर्कप्रमुख बाळासाहेब दाजी पाटील, तालुका उपाध्यक्ष सागर काळे, तालुका सचिव अभिजीत रोटे, जिल्हा उपाध्यक्ष चिमणे साहेब, लोहारा तालुका अध्यक्ष रवी पवार, गणी मुलानी, श्रीकांत करंडे, भागवत बरगंडे, दिलीप देवकर, प्रेमानंद वाघमारे, दयानंद गड्डे, बंडू घुगे, साहेब शेख, अशोक पाटू, सामाजिक कार्यकर्ते अंबादास वराडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top