महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण सदस्य मा.श्री. उमाकांत मिटकर यांचा सोमवार गिरी मठ तसेच विविध संघटनांकडून सत्कार

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथील सुपुत्र श्री. उमाकांत मिटकर यांची राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या सदस्य पदी पुनर्नियुक्ती झाली, याबद्दल  महंत श्री ईच्छागिरी महाराज,सोमवार 

गिरी मठ,(नारायणगिर ट्रस्ट) यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू जनजागृती समिती, हिंदुराष्ट्र सेना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, द आर्ट ऑफ लिविंग श्री श्री रविशंकर ,व्यापारी मंडळ,आरोग्य विभाग तसेच समस्त धार्मिक - अध्यात्मिक व सामाजिक सर्व संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

मुळत: ग्रामीण भागात आपले बालपण जगलेल्या  उमाकांत मिटकर यांना समाजातील विविध घटकांच्या असंख्य प्रश्र्नांची जाणीव झाली आणि त्यांनी स्वत:ला समाज कार्यात झोकून दिले. त्यांच्या  सामाजिक कार्याची दखल घेऊन विविध धार्मिक, सामाजिक संघटनानी त्यांचा अनेक पुरस्कारांनी सन्मान केला.

मिटकर यांनी भटके विमुक्त संघटनात्मक काम केले, सरकारच्या पालावरील शाळा येथे मार्गदर्शन करणे असे विविध सामाजिक कार्य त्यांनी केले. जिल्हा स्तरीय विविध पुरस्कारांसह एक ५६ पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. नुकतीच त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन झालेल्या राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या सदस्य पदी पुनर्नियुक्ती झाली असून या निवडीबद्दल त्यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top