महत्वाची बातमी ; मंदिर परिसरात मास्क अनिवार्य

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

देशामध्ये कोरोना विषाणूचा नवीन व्हेरियंट B.F 7 संक्रमित असल्यामुळे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तर्फे परिपत्रक काढून महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात येणाऱ्या सर्व भाविक भक्त, महंत, पुजारी बांधव व कर्मचारी यांनी कोरोना विषाणुंचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी मास्क सक्ती करण्यात आली असून सोशल डिस्टन्स नियमासह मास्क बंधनकारक असणार आहेत.

मंदीर संस्थांनच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन यांनी याबाबत हे आदेश दिले आहे. सध्या कोरोना BF7 व्हेरीयंट अनुषंगाने उपाय योजना केल्या जात आहेत.

तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र उत्सव ३० डिसेंबर पासून घटस्थापनाने सुरुवात होत आहे. त्यातच मास्क बंधनकारक केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणेसाठी खाली नमुद सुचनांचे तंतोतंत पालन करावे असे प्रसिद्धी पत्रकातून आव्हान केले आहे 

1) मंदिर व मंदिर परिसरात व सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क वापरण्यात यावेत.

2) सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात यावे.

3) आपले हात नियमित साबनाने अथवा सॅनिटयझरने स्वच्छ ठेवण्यात यावेत.

4) अंतरराष्ट्रीय प्रवास टाळावा.

5) जर आपणास ताप, खोकला, सर्दी, संडास, उल्टी, डोकेदुखी व सांधेदुखी या आजारांचा त्रास होत असल्यास तात्काळ नजीकच्या दावाखन्यास भेट देऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.






Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top