तुळजापूर प्रतिनिधी
सन 2022 च्या पीकविम्यातील वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना जो पर्यंत पीक विमा मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना शेकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी झटत राहिल असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवार दि 27 रोजी करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलन दरम्यान जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी शेतकऱ्यांना बोलताना म्हणाले.
शेतकऱ्यांना केवळ रात्रीच्या वेळी व ती ही मर्यादीत कालावधीसाठी विज पुरविली जाते रात्रीच्या वेळी सर्प दंश होवुन अनेक शेतकऱ्यांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. काही शेतकऱ्यांना डीपी घेण्यासाठी पाच पाच वर्षे वाट बघावी लागत आहे येत्या काळात लवकरात लवकर मागणी केलेल्या शेतकऱ्यांना डीपी तात्काळ देण्याचे काम करावे अन्यथा आपली व शेतकऱ्याची गाट राहिल असा इशारा यावेळी महावितरण कंपनीला दिला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाअध्यक्ष रविंद्र इंगळे, उपाध्यक्ष धनाजी पेंदे, तालुकाध्यक्ष दुर्वास भोजणे, नेताजी जगदाळे, उत्तम अमृतराव, सतिश डोके, नरसिंग पाटील, डाँ अनिल धनके, प्रदीप भोजने, प्रदीप जगदाळे, चंद्रकांत नरोळे, सुशांत गाडे अदि सह हजारो शेतकरी बांधव रास्ता रोको आंदोलनात सहभागी होते.
