तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS) येथे आजमंगळवार दि. २७ रोजी एक दिवसीय सेंद्रीय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणुन मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांस आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी टाटा सामाजिक विज्ञान संस्थाचे उप संचालक श्री. रमेश जारे, जिल्हा कृषी अधीक्षक श्री. महेश तीर्थकर, कळंब उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक, श्री. एम. रमेश, कार्यशाळा समन्वयक - श्री. गणेश चादरे, पोनि - श्री. अजीनाथ काशीद, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे पदाधिकारी तसचे कृषी तज्ञ व जिल्ह्यातील सेंद्रीय शेती करणारे १५० शेतकरी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
कार्यशाळेदरम्यान मा. पोलीस अधीक्षकांनी पर्यावरण पुरक अशा सेंद्रीय शेतीचे महत्त्व पटवून दिले तर कृषी तज्ञांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.सदर कार्यशाळेनंतर मा.पोलीस अधीक्षकांच्या शुभहस्ते टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या परिसरातील काटेरी बाभूळ काढून पर्यावरणपुरक अशा वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी मा. पोलीस अधीक्षकांनी काटेरी बाभूळ जेथे येतात तेथील परिसर पडीक पडून त्याच्या सानिध्यात अन्य वृक्ष येत नसून काटेरी बाभूळपासून पर्यावरणास फायदा नसून उलट नुकसानच असल्याचे प्रतिपदन केले.

