संभाजी राजेंची सत्ताधारी व विरोधकांवर सडकून टिका

mhcitynews
0

नांदेड प्रतिनिधी 

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्प अभियानाच्या दोन दिवसीय नांदेड दौऱ्यात जिल्ह्यातील हिमायतनगर व हदगाव तालुक्यात स्वराज्य संघटनेच्या अनेक शाखेचे उद्घाटन करण्यात आले. दौऱ्यादरम्यान प्रत्येक गावात अनोख्या पद्धतीने स्वराज्य चे स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवसाच्या सांगता सभेमध्ये छत्रपती संभाजीराजेंनी स्थानिक प्रश्नांसोबतच विधानसभेत होत असलेल्या गदारोळा विषयी भाष्य करताना सरकार सह विरोधकांवर निशाना साधला.

काल शेतकरी दिन असून देखील शेतकऱ्यांसाठी सरकार काहीही करत नसल्याचे भाष्य छत्रपती संभाजी महाराजांनी केले. सोबतच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत स्वराज्य ला मिळालेल्या विजयामुळे स्वराज्य ने राजकारणात यावे ही लोकांची भावना असल्याचे बोलत स्वराज्य बाबत राजकीय संकेत दिले.

अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी काहीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे संभाजीराजेंनी टिका केली. अधिवेशन चालू असताना आरोप प्रत्यारोप करणे करणे चुकीचं असून आरोप प्रत्यारोप करणे हा तुमचा अधिकार असून अधिवेशन हे सामान्य लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी असल्याचे बोलत सत्ताधारी व विरोधकाचा समाचार घेतला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top