किसन व्हरकट यांची आसाम रायफल्स हवालदारपदी निवड

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील आरळी बु येथील शेतकरी कुटुंबातील मेहनती युवक किसन माणिक व्हरकट याची आसाम रायफल्सच्या हवालदारपदी निवड झाली असून गाव स्तरावर कौतुक व अभिनंदन केले जात आहेआसाम रायफल्स (एआर) ही केंद्रीय निमलष्करी दल आहे जी ईशान्य भारतातील सीमा सुरक्षा, बंडखोरी विरोधी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदार आहे. ते भारत-म्यानमार सीमेचे रक्षण करते. आसाम रायफल्स हे भारतातील सर्वात जुने निमलष्करी दल आहे.किसनचे आई वडील दोघेही शेतकरी आणि शेतमजूर असून कुटुंबात जेमतेम ३.५ एकर पाण्याची हंगामी शेती आहे.वडिलांनी शेतमजुरी करण्यापूर्वी सोलापूर येथे मिल मध्ये कामगार म्हणून काम केलेले.किसनला एक भाऊ असून तो होमगार्ड असून तुळजापुर तालुक्यातील सुरक्षा यंत्रणांसोबत कार्यरत आहे.किसनच्या निवडीबद्धल ग्रामस्थ व मित्र परिवार यांच्याकडून अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top