मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचे आयोजन लाभ घेण्याचे आव्हान

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद कौशल्य आधारित उद्यमिता कार्यक्रम द्वारा संचालित नवनिर्मिती प्रेरणा बहुउद्देशीय महिला मंडळ सामाजिक संस्था तुळजापूर यांच्या सहकार्याने एक महिना कालावधी करीता दिनांक 2 जानेवारी पासून मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षणाला सुरूवात करण्यात येणार आहे.

सहभागी महिला व युवतींना यामध्ये ब्युटी काॅस्मॅटिक, हेयर कट, मेकअपचे प्रकार, स्किन ट्रीटमेंट, हेयर ट्रीटमेंट, फेशियल इत्यादी माहिती व प्रात्यक्षिक प्रशिक्षणाद्वारे शिकवण्यात येणार आहे तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना भारत सरकारचे प्रमाणापत्र देण्यात येणार आहे. तरी लवकरात लवकर याचा सर्व महिला युवतींना मोफत प्रशिक्षणचा लाभ घ्यावा असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक धनंजय काळे साहेब व नवनिर्मिती प्रेरणा बहुउद्देशीय महिला मंडळ सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी अष्टभुजा महिला पतसंस्था शेजारी, दुर्गा नंदी अपार्टमेंट रावळ गल्ली आर्य चौक तुळजापूर येथे संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top