कोराळ येथे गृहिणींना गॅस सिलेंडरचे वाटप

mhcitynews
0

उमरगा प्रतिनिधी 

उमरगा तालुक्यातील कोराळ येथे प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थी महिला प्रभावती कांबळे, वर्षा सुरवसे, सुगलबाई मुगळे, छाया चोपडे, सरिता कांबळे, अयोध्या सुरवसे, संपता गायकवाड, सरोजा सुरवसे मंजुश्री सुरवसे यांना ग्रा.पं. सदस्य परमेश्वर कांबळे यांच्या पुढाकारातून स्वयंपाकाच्या गॅसचे वाटप करण्यात आले.

गॅस वापरताना घ्यावयाची काळजी व वापराचे फायदे याबाबत लाभार्थी महिलांना मार्गदर्शन करून छाया गॅस एजन्सीच्या वतीेने उपस्थितांचे आभार मानण्यात आले. या वेळी विलास भगत, बालाजी सुरवसे, अमोल सुरवसे, ज्ञानेश्वर कांबळे, मनोहर सुरवसे, प्रकाश जंगाले, परमेश्वर कांबळे यांच्या सह लाभार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top