तुळजापूर प्रतिनिधी
तृतीय वर्षा प्रमाणे द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांना ही कम्बाईन पासिंग भविष्याचा विचार करून द्यावे अशी साद अभियांत्रिकी महाविद्याल्यातील शिकत असलेल्याविद्यार्थ्यांनी कुलगुरुनां निवेदनाद्वारे दिली.
श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य मार्फत दिलेल्या निवेदनात नमूद केली आहे की, द्वितीय वर्षात ( २०२२-२३ ) शिकत असलेले विद्यार्थीनी, कोव्हीड-१९ मुळे सन २०१९ व २०२० मध्ये ऑनलाईन परीक्षा दिली. क्लासेस सुध्दा ऑनलाईन झाले होते, नेटवर्क प्रॉब्लेममुळे विद्यार्थ्यांचे बेसिक पूर्ण झाले नाही आणि कोव्हीड-१९ नंतर प्रथमच ऑफलाईन पेपर दिले, त्यामध्ये बरेच विद्यार्थी नापास झाले. तृतीय वर्षामध्ये कम्बाईन पासिंग लागू आहे, द्वितीय वर्ष २०२२-२३ ला कम्बाईन पासिंग लागू नाही, मा. कुलगुरू साहेबांनी विद्यार्थ्यांची विनंती स्विकारून व विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून द्वितीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना कम्बाईन पासिंग द्यावे अशी मागणी केली आहे सादर निवेदनाची प्रत माहितीस्तव जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर व आमदार राणाजगजितसिंहजी पाटील तथा सदस्य श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांना देण्यात आली.निवेदनावर कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअर, सिविल इंजिनिअर व मेकॅनिकल इंजिनिअर द्वितीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.