अतिदक्षता विभागाचे ( ICU ) उदघाटन
प्रतिनिधी : कुमार नाईकवाडी
उपजिल्हा रुग्णालयच्या माध्यमातून श्री देवी भक्तासह नागरीकांच्या आरोग्य समस्या बाबतीत मुलभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर अधिक भर देण्याचा प्रयत्न करणार उस्मानाबाद जिल्हा चिकित्सक श्री डाँ गंलाडे यांनी बुधवार दि.२८ रोजी आयोजित पञकार परिषदेत बोलत होते या वेळी उपजिल्हा रुग्नालय समितीचे सदस्य आनंद(दादा) कंदले उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी डाँ संतोष पाटील,डाँ श्रीधर जाधव, डाँ चंद्रकांत क्षिरसागर आदीसह वैद्यकीय क्षेञातील डाँ.कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना डाँ गंलाडे म्हणाले की तुळजापुर हे तिर्थ क्षेञ असल्यामुळे तुळजापुर उपजिल्हा रुग्नालय या ठिकाणी भाविकासह नागरीकांच्या आरोग्य समस्याच्या बाबतीत अधिका अधिक मुलभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला जाईल तुळजापुर उपजिल्हा रुग्नालय हे १०० खाटाचे रुग्नालय असल्यामुळे या ठिकाणी सिटी स्कँन ची सुविधा, डायलेन्सची सुविधा उपलब्ध लवकरच करण्यात येईल तसेच फिजिशनची व्यवस्थाही चांगल्या प्रकारे कशी करता येईल याचाही प्रयत्न करणार सध्या उपजिल्हा रुग्नालय येथे रुग्णासाठी आय सी.यु.सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे तसेच सिटी स्क्ँन आदीसह रुग्णासाठी लागणारे साहित्याची लवकरात आरोग्य विभागाकडून उपाययोजना करणार 250 ते 300दररोज ओ पी डी होतं असतात तर दररोज 40 ते 50 एक्स रे काढली जातात तुळजापुर उपजिल्हा रुग्नालय येथे मी स्वःता जातीने लक्ष देवुन भाविकासाठी व नागरीकांच्या आरोग्य समस्ये विषयी निवारन करण्याचा प्रयत्न करणार तुळजापुर येथील उपजिल्हा रुग्नालयात नागरीकांना रुग्न सेवा देताना डाँक्टरांनी व कर्मचारी वर्गानी सामाजिक बांधिलकी ओळखून रुग्नाना सेवा देण्याचा प्रयत्न करावा संसर्गजन्य कोरोनाची तिसरी लाट आल्यास जिल्हातील रुग्नालये नागरीकांच्या सेवेसाठी तयार असणार आहेत.
ज्या अनुषंगाणे आरोग्य संस्थांना येत असलेल्या अडचणी दूर करून व समिती मार्फत रुग्ण सेवा जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण देणे ह्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालय केंद्राच्या ठिकाणी रुग्ण कल्याण समिती स्थापन केली जाते त्याचप्रमाणे आनंद कंदले यांची ची निवड सार्थ ठरल्याचे जिल्हा चिकित्सक डाँ गंलाडे यांनी यावेळी बोलताना म्हणाले.
