पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे नागरिकांना आव्हान

mhcitynews
0

उस्मानाबाद प्रतिनिधी 

वेळाअमावस्या असल्याने आपल्या शेतीकडे साजरी करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या राहत्या घरातील मौल्यवान वस्तू सोबत घेऊन जाण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे. त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना या माध्यमातून सावधानतेचा इशारा दिला आहे

त्यांनी दिलेल्या संदेशात म्हटले आहे,

जिल्ह्यातील सर्व नागरिक उद्या दि.23 वेळाअमावस्या असल्याने प्रत्येक गावातील, प्रत्येक परिवार आपापल्या शेतात जाऊन सण साजरा करतात. त्यामुळे शेतात जात असताना घ्यावयाची काळजी घ्यावी. आपल्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने दागिने व इतर मौल्यवान वस्तू शक्यतो सोबत घेऊन जावे. आग्रहाची विनंती कि किमान एक माणूस आपल्या घरी ठेवावा. घराला व्यवस्थित कुलूप लावावे. आपल्या घराची व दाग दागिन्याची काळजी आपणच घ्यावी. संशयित इसम आढळून आल्यास तत्परतेने आपल्या पोलीस ठाणे येथे संपर्क करावा. चोरापासून सावध रहा. अशी जनहितार्थ माहिती पोलीस अधीक्षक यांनी केली आहे

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top