उस्मानाबाद जनता सहकारी बॅक लि. शाखा नळदुर्ग रोड तुळजापुर येथे कर्तव्यावर असणारे - राजकुमार चंद्रकांत मोरे, रा. उस्मानाबाद यांनी दि. 06.12.2022 रोजी 13.00 ते 16.00 या दरम्यानच्या काळात उस्मानाबाद जनता सहकारी बॅक लि. शाखा खातेदार प्रकाश मुढें रा. ढेकरी यांचे बचत खाते क्र.28377 नावाने पैसे काढण्यासाठी विड्राल स्लिपवर स्वताची सही करून ती खोटी आहे हे माहित असतांना ही सदर स्लिप खरी आहे असे भासवून त्याचा वापर करून बॅकेची व खातेदाराची 15,000 ₹ रक्कमेचा स्वत:च्या फायद्यासाठी अपहार केला. अशा मजकुराच्या बॅक शाखा अधिकारी- श्री. जनार्धन माडे यांनी दि. 18.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 465, 468, 471, अंतर्गत तुळजापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
.jpeg)