भालाफेक स्पर्धेत जि.प.प्रशाला तुळजापूरचे यश

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 
शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी उस्मानाबाद जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल उस्मानाबाद येथे संपन्न झाल्या. त्यामध्ये 17 वर्षे वयोगट मुले भालाफेक स्पर्धेमध्ये काक्रंबा बीट अंतर्गत जि. प. प्रशाला तुळजापूरचा विद्यार्थी प्रविण प्रभाकर वाघमारे याने द्वितीय  क्रमांक पटकावला. त्या विद्यार्थ्याला अनिल शेळके व  सुनील पांचाळ यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक पांचाळ एस. एम. ,गटशिक्षणाधिकारी मेहरूनिशा बेगम इनामदार , विस्तार अधिकारी मल्लिनाथ काळे, केंद्रप्रमुख सतीश हुंडेकरी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, शिक्षक रवींद्र स्वामी, दीपक सोनवणे, अमोल मेंढेकर, गणेश जाधव, किरण कोकाटे  यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top