बापरे! बनावट पीआर कार्ड व टोच बनवून शासनाची फसवणूक गुन्हा दाखल

mhcitynews
0

 


उपाधीक्षक भूमी अभिलेख येथील प्रकार ?

तुळजापूर प्रतिनिधी 

तुळजापूर शहरातील उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथील भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे दिवसेंदिवस गैरप्रकार होत असून या प्रकारामध्ये तत्कालीन अधिकारी सामील आहेत .बनावट  कबालाच्या आधारे खडाखोड करून पी आर कार्ड व टोच नकाशा तयार करून नगरपरिषद कार्यालय येथे नामांतरणासाठी बनावट कागदपत्र तयार करून भूखंड नसलेल्या व्यक्तीच्या नावावर भूखंड असल्याचे भासवून फिर्यादीची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भूमी अभिलेख कार्यालय येथील अधिकाऱ्यांसह एक जणांवर तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे .

याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार दिनांक 07 जानेवारी 2015 रोजी उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथे तहसीलदार तुळजापूर यांनी दिलेल्या कबालावर खडाखोड करून बनावट कबाला तयार करून भूखंड नसलेल्या व्यक्तीच्या नावावर संबंधित आरोपी व अधिकारी यांनी संगणमत करून बनावट पी आर कार्ड व टोच नकाशा बनवून सदर नोंदी खरं असल्याच्या भासवून नगरपरिषद तुळजापूर येथे सदर कागदपत्र खरे असल्याचे भासवून नामांतरण करून फिर्यादीची आई व शासनाची संगणमत करून फसवणूक केली सदर प्रकार हा माहिती अधिकार यामधून उघड झाला आहे .

याप्रकरणी राहुल कोळी वय 31 वर्ष राहणार विवेकानंद नगर तुळजापूर यांनी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून वामन मारुती टोम्पे व भूमी अभिलेख अधिकारी यांच्या विरोधात तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 06/23 नुसार भादवि कलम 420,468, 471,34 प्रमाणे तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार 1143 औताडे ही करत आहेत .सदर हा भ्रष्ट कारभार उघड झाल्यामुळे  उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथील गैर कारभार मधील अधिकारी आरोपी कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे . पोलीस तपासामध्ये उपभूमी अधीक्षक कार्यालय येथील कोणकोणत्या अधिकाऱ्यांची भ्रष्ट कारभारामध्ये नावे समोर येणार आहे  संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे .

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top