तुळजापूर प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर मार्फत शहरातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणीसाठी दि 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान "रुग्णालय आपल्या दारी" उपक्रम राबवण्यात आला.
शहरातील श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान, एस.टी चालक व वाहक, नगर परिषद तुळजापूर, पोलीस स्टेशन, तहसील, विज महावितरण, पंचायत समिती या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली, या मध्ये रक्तदाब (B.P), शुगर तपासणी, H.B तपासणी, दंतरोग तपासणी करण्यात आली, शासकीय अधिकारी व कर्मचारी हे सतत कर्तव्यावर व्यस्त असतात व आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ नसतो या उद्देशाने रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले यांच्या संकल्पनेतून व वैद्यकीय अधिक्षक डॉ.संतोष पाटील सर यांच्या कुशल नियोजनात हा उपक्रम राबवण्यात आला, एस. टी डेपो येथे आगार प्रमुख श्री दिवटे साहेब, नगर परिषद येथे डि.वाय.एस.पी.भोर पाटील मॅडम, पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद साहेब,मुख्याधिकारी नातु साहेब, युवा नेते विनोद गंगणे, मा. नगराध्यक्ष सचिन रोचकरी, औदुंबर कदम, किशोर साठे, मंदिर संस्थान येथे मंदिर तहसिलदार कोल्हे मँडम, व्यवस्थापक विश्वास काका कदम साहेब, नागेश शितोळे साहेब व सहकारी, तसेच पंचायत समिती येथे प्रशासन अधिकारी मगर मँडम, मैदर्गे साहेब, देवकर साहेब,ग्रामसेवक गोरे साहेब व सहकारी उपस्थित होते.
या सर्व शासकीय कार्यालयात एकुण 383 अधिकारी व कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 46 शुगर व 63 बी.पी चे नवीन पेशंट आढळून आले त्यांना पुढील उपचारा संदर्भात वैद्यकीय सुचना देण्यात आल्या शिबिरात उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ सय्यद, डॉ ठाकुर, डॉ मलबा मँडम, मोहळकर मँडम, हिरेमठ मँडम, चौधरी मँडम, यांनी चार दिवसाचे हे शिबीर यशस्वी केले.
