तुळजापूर प्रतिनिधी
लोककल्याणकारी राजे, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जगभरात साजरी केली जात आहे. तुळजापूर शहरात महाराजांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या
पुतळ्याजवळ सकाळपासूनच मोठी गर्दी जमली होती. सकाळी शासकिय महापुजा करण्यात आली. पूजन करून भगवा ध्वज फडकविण्यात आला. याप्रसंगी मावळे, ढोल ताशा वाजवत जयंती साजरी केली.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मुस्लिम बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार घालून जयंती साजरी करून. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार घालण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी, औदुंबर कदम, अविनाश गंगणे, राहूल खपले, आनंद दादा कंदले, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर मगर, रणजीत इंगळे, अमोल कुतवळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष गोकुळ तात्या शिंदे, युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, बबन गावडे,किशोर गंगणे, नानासाहेब डोंगरे, दत्ता क्षिरसागर, महेश गवळी, प्रशांत अपराध, नवनाथ जगताप, कुमार टोले तसेच शहरातील मुस्लिम समाजाचे जेष्ठ हाजी जावेद बागवान, हाजी रसूल बागवान, युसूफ भाई शेख, लालासाहेब तांबोळी, फेरोज पठाण, आरिफ बागवान, तौफिक शेख, अशपाक अत्तार , हज्जुमिया अत्तार, मोहसीन बागवान, मकसूद शेख, रजाक शेख, वाहेद शेख, अशपाक सय्यद, रफिक बागवान, मुसा नदाफ, अशपाक शेख, मतीन बागवाब, जफर शेख, अयाज शेख, कलीम शेख, जमीर शेख, जफर शेख, वसीम शेख, पत्रकार जुबेर शेख, सिध्दीक पटेल तसेच शहरातील समस्त मुस्लिम बांधव व हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
