कळंब येथील तीन चंदन तस्कर केज पोलिसांकडून अटक,मुद्देमाल व हत्यारे जप्त

mhcitynews
0


कळंब प्रतिनिधी सलमान मुल्ला

केज तालुक्यातील भोपला येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन चंदन तस्कर ताब्यात घेतले असून एका मोटार सायकलसह त्यांच्या कडून ५५ हजाराचा मुद्देमाल आणि तस्करीसाठी वापरलेली हत्यारे ताब्यात घेतली आहेत.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील भोपला ते वरपगाव दरम्यान चंदन तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या आदेशाने पोलीस हवालदार मारुती कांबळे, पोलीस नाईक जायभाये, पोलीस नाईक पठाण, पोलीस अंमलदार यादव यांनी दि. २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:०० वा च्या दरम्यान भोपला येथे सापळा लावला असता राजेंद्र किसन काळे (रा. इंदिरानगर कळंब) व त्याचे साथीदार फारुक पाशा बागवान (रा. इंदिरा नगर कळंब), दत्तात्रय नारायण तावरे (रा. इंदिरा नगर, कळंब) हे तिघे मोटार सायकल क्रमांक (एम एच - २५/ ए सी - ५६३२) वरून जात जो सताना आढळून आले. 

त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अडवून झाडाझडती घेतली असता त्यांच्या सोबतच्या असलेल्या पिशवीत चंदन असल्याचे आढळून आले.त्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे चंदन तस्करी करण्यासाठी वापलरी जात असलेले साहित्य मिळून आले. त्यांच्याकडून पोलिसांनी १२ किलो ग्रॅम वजनाचे चंदनाचा गाभा, मोटार सायकल व चंदन तस्करी करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण ५५ हजार रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या आदेशाने पोलीस हवालदार मारुती कांबळे यांनी राजेंद्र किसन काळे, फारुक पाशा बागवान, दत्तात्रय नारायण तावरे विरुद्ध भा. दं. वि. ३७९,३४ आणि भारतीय वन अधिनियम ४१, ४२ व राष्ट्र वन अधिनियम कलम २६ (एफ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top