कळंब प्रतिनिधी
इटकुर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक दि 25 रोजी घेण्यात आली यात शंभू महादेव सर्व पक्षीय शेतकरी सहकारी विकास आघाडीचे तेरा पैकी बारा उमेदवार हे बहुमताने निवडून आले..
तर एक उमेदवार बिनविरोध निवडून आला यात आडसुळ दिलीप राजेंद्र यांना 900 बावळे सतीश सर्जेराव यांना 888 फरताडे दादासाहेब महिपती यांना 882 गाडे अरुण चंद्रहास यांना 855 तर गोडगे रामहरी निवृत्ती 849 गंभिरे ज्ञानदेव मुरलीधर 869 गंभिरे सचिन आश्रुबा यांना 903 कोठावळे शंकर कोंडीराम यांना 838 क्षिरसागर दिनकर बाबुराव यांना 938 कदम भास्कर गणपती यांना 916 तर महीला प्रतिनिधी म्हणून आडसुळ सुशिला सर्जेराव यांना सर्वाधिक 953 तर दुसऱ्या महीला प्रतिनिधी म्हणून पाटील रविना विलास यांना 908 तर बिनविरोध म्हणून गायके देविदास महादेव यांची निवड झाली .
या निवडणुकीत इटकुर कोठाळवाडी,गंभिरवाडी,आडसुळवाडी या चार गावांचा समावेश आहे निवडणुकीत निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बी ए शिंदे यांनी जाहीर केले.
