जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेला विरोध

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

केंद्र व राज्य शासन यांच्या जल जीवन मिशन या योजनेला अपसिगासह काक्रंबा गावातून विरोध होत आहे. अपसिगा व काक्रंबा या गावासाठी जल जीवन मिशन या योजनेतून रामदारा तलाव तुळजापूर येथून पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे मात्र या ठिकाणी तुळजापूर परिसर व टाटा सामाजिक संस्था येथील शौचालयाचे आउटलेट पाणी, सांडपाणी व नालीचे पाणी मोठ्या प्रमाणात जाते त्यामुळे सदरील पाणी पिण्यास योग्य नाही, या तलावास कॅचमेट एरिया जास्त नाही त्यामुळे या तलावात जमा होणारे पाणी ६० टक्के तुळजापूर परिसराचेच आहे. यामुळे सदरील घाण पाणी न देता इतर ठिकाणाहून ही योजना राबवावी अशी मागणी अपसींगा व काक्रंबा येथील नागरिकांतून होत आहे.

अपसिंगा शिवारात जलयुक्त शिवार या योजनेतून कोट्यावधी रुपयाचे काम झालेले आहेत. अपसिंगा गावात जलयुक्त शिवार चे उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हास्तरीय अहिल्यादेवी होळकर जलमित्र प्रथम पुरस्कार व एक लाख रुपयाचे बक्षीस ही मिळाले आहे. इतकी मोठी योजना राबवून ही गावात पाणी उपलब्ध नाही.

अपसिंगा परिसरात पिण्याचे पाणी उपलब्ध नसेल तर कृषी व अन्य विभागामार्फत जलयुक्त शिवार या योजनेचे कामे कशा पद्धतीने झाली याची चौकशी करावी अन्यथा माननीय आयुक्त यांना भेटू असे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिव अल्पसंख्याक सेना चे जिल्हाप्रमुख अमीर शेख व ग्रामस्थ यांनी म्हटले आहे.

जिल्हाअधिकारी यांनी अपसिंगा गावास जलयुक्त शिवार चे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुरस्कार दिला हे खरे पण भुजल अधिकारी उस्मानाबाद यांनी आपसिंगा शिवारातील पाण्याचे स्ञोत का दाखवले नाही, म्हणजेच अपसिंगा गावातील पाण्याची पातळी वाढलीच नाही मग उत्कृष्ट पुरस्कार दिलाच कसा, व पाण्याची पातळी वाढली का नाही हे ही तपासून पाहावे असे  निवेदनात म्हटले आहे.

तसेच काक्रंबा ग्रामपंचायत चे सदस्य अनिता दिगंबर मस्के, सविता दिलीप बंडगर, शितल विकास चंदनशिवे, विशाल शशीकांत खताळ, सद्दाम जिलानी मुलानी, व  चेतन दिलीप बंडगर शिवसेना सोशल मिडीया तालुकाप्रमुख तुळजापूर यांनी दिनांक 8 फेब्रुवारी रोजी गट विकास अधिकारी तुळजापूर यांना रामधारा तलावातील पाण्याचे स्त्रोत बदला नाहीतर  नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा दिला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top