तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर शहरातील आठवडा बाजार येथे दर मंगळवारी आठवडा बाजार भरला जातो या दिवशी तालुक्यातून मोठ्या संख्येने शेतकरी भाजी विक्रीसाठी येत असतात नगर परिषद च्या वतीने लोकांच्या सोयीसाठी पाण्याची टाकी बसवली खरी पण या टाकीमध्ये पाणी नसल्याने नागरिकांची, भाविकांची गैरसोय होत आहे फेब्रुवारी महिना चालू झाल्याने हळूहळू उन्हाची चाहूल वाढु लागली आहे ऊन वाढत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी भाविक आणि नागरिकांची तारांबळ उडत आहे.
तसेच आठवडा बाजार येथे देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात असते पाण्या वाचून यांची गैरसोय होत आहे येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल भोसले यांनी स्वखर्चाने भाविक आणि शेतकऱ्यांसाठी टॅंकरने पाणी पुरवले यावेळी पाणी घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली नगरपरिषदेच्या वतीने वतीने कायमस्वरूपी पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
