खानापूर सोसायटीच्या चेअरमन पदी मारुती गायकवाड,व्हॉईस चेअरमनपदी मुबारक शेख बिनविरोध

mhcitynews
0

रजाक शेख 

तुळजापूर तालुक्यातील खानापूर विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या चेअरमन पदी मारुती गायकवाड तर व्हॉईस चेअरमनपदी मुबारक शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.चेअरमन पदासाठी एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी जाधव यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम एक महिन्यापूर्वी जाहीर झाला होता. यामध्ये संचालकपदासाठी तेरा जागवर तेराच अर्ज आल्याने सर्व संचालकांची निवडणूक बिनविरोध झाली होती. यामध्ये मधुकर धोंडीबा गायकवाड,अर्जुन राम धुते,नागनाथ धबाले,महादेव धुते,सरदार  शेख,गुरुसिध वाघमारे,युसुफ पटेल,सुधाकर क्षीरसागर,अफसर सय्यद,सुरेखा  सगरे,लक्ष्मी  जेउरे यांची संचालक पदी बिनविरोध झाली होती.

सोसायटी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी माजी जि.प.सदस्य वसंतराव वडगावे,सरपंच सुधाकर हिप्परगे,उपसरपंच सतीश गायकवाड, माजी सरपंच उत्तम धुते ,इब्राहिम पटेल, अफसर सय्यद, युसूफ पटेल, इसाक मुजावर,हजरत पटेल, ग्रां. प.सदस्य बंडू धुते, आप्पराव कांबळे,विलास गायकवाड, नसीर पटेल,रहीम मुजावर,बलभीम गायकवाड,गणपती उन्हाळे ,पोलीस पाटील अमोल हिप्परगे,जाफर शेख,सुभाष गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

या निवडीनंतर खानापूर व टेलरनगर ग्रामस्थांच्या वतीने नूतन चेअरमन,व्हॉईस चेअरमन,संचालक यांचा फेटा,शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जाधव यांनी तर ,सचिव महावीर तांबे, तपासनिस कृष्णा ढाले,सेक्रेटरी राजू धुते यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top