शिराढोण प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील शिराढोण येथील धडाडीच्या महिला कार्यकर्त्या सौ मयुरी अक्षय धाकतोडे यांची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कळंब तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, नंदाताई सुरेशराव पुनगडे यांनी निवडीचे पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
पक्ष बांधणी व संघटनेचा विस्तार करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण कार्यरत राहणार असल्याचे अभिवचन सौ धाकतोडे यांनी यावेळी आवर्जून सांगितले. या झालेल्या निवडीबद्दल शिराढोण व पंचक्रोशीतील महिला मंडळी कडून अभिनंदन व्यक्त होत आहे.
यावेळी जिल्हा परिषद च्या माजी अध्यक्ष अस्मिता ताई कांबळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य नरसिंगे मॅडम, लीगलसेल अध्यक्षा निपाणीकर मॅडम,जिल्हा उपाध्यक्ष विद्याताई माने उस्मानाबाद तालुका अध्यक्ष उषाताई (सर्जे) येरकळ, तुळजापूर पंचायत समितीचा सभापती रेणुकाताई इंगळे, समन्वयक वैशालीताई गुंड सोलापूर, अल्काताई गौरकर अल्काताई मगर व भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीन काळे यांची उपस्थिती होती.
