राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्राच्या तसेच राष्ट्रीय राजकारणात त्यांची कारकीर्द गाजवत आहेत. अगदी सुरुवातीच्या काळापासूनच शरद पवार बिना दाढीच्या लूकमध्ये वावरत असतात. मात्र शरद पवारांच्या कन्या व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचा तरुणपणातला एक फोटो पोस्ट केलाय ज्यामध्ये पवारांनी दाढी राखलेली दिसून येत आहे.
सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या वैयक्तिक इंस्टाग्राम खात्यावर एक फोटो पोस्ट केलाय ज्यामध्ये शरद पवारांसोबत सुप्रिया सुळे दिसून येत आहेत. हा फोटो पवारांच्या तरुणपणातला असून या फोटोमध्ये शरद पवारांची फ्रेंच दाढी दिसून येत आहे. सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केलेल्या फोटोखाली Nostalgia असं कॅप्शन सुद्धा दिलं आहे. सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केलेला हा फोटो चांगलाच व्हायरल झाला असून सर्वत्र या फोटोची चर्चा सुरु आहे.
.jpeg)
