तुळजाभवानी उत्पत्तीदिन शहरात विविध कार्यक्रमाने साजरा

mhcitynews
0

तुळजापुर प्रतिनिधी 

चैत्र दुर्गाअष्टमी अर्थात तुळजाभवानी उत्पत्तीदिन यानिमित्त शहरात पुजारी व सेवेकरी यांच्यावतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पुजाऱ्यांच्यावतीने श्री तुळजाभवानीची पूजा करून देवी भक्तांना महाद्वार परिसरात अन्नदानरुपी प्रसाद व मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी बाळासाहेब भोसले ,शिवाजीराव बोधले, महेश अमृतराव, सचिन जाधव ,सचिन भांजी, अक्षय करडे ,इर्शाद शेख, केदार खुरुद इ.जण उपस्थित होते. यापुढे श्री तुळजाभवानी देवीचा प्रकट दिन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला. शहरवासीयांनी आपापल्या घरी तुळजाभवानीच्या प्रतिमेचे व मूर्तीचे विशेष पूजन करून भातसाखरेचा नेवैद्य दाखवून सुवासिनीना बोलावुन त्यांची ओटीभरन करून प्रसादाचे वाटप केले तर काही महिलांनी यानिमित्त कुमकुम अर्चन कार्यक्रम घेतला. 

यापुढे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने तुळजाभवानी उत्पत्ती दिनानिमित्त पुढाकार घेऊन मंदिरात विविध धार्मिक उपक्रम घ्यावेत अशी मागणी पुजारी शिवाजीराव बोधले यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top