हजारो लोकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ सप्ताहाची सांगता

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

तुळजापूर दिनांक 31 येथील एस टी कॉलनी परिसरात सलग 12 वर्षापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह. व ज्ञानेश्र्वरी पारायण सोहळ्यास भाविकांकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद व नामवंत कीर्तनकार यांच्या उपस्थिती मुळे गुढीपाडव्या पासून सुरु असलेल्या या सोहळ्याने दहा दिवस भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.हा कार्यक्रम गेल्या वर्षापासून झी टीव्हीवर प्रक्षेपण होत आहे. सयोंजक विशाल रोचकरी यांच्या नियोजना मुळे सप्ताह यशस्वी पणें संपन्न होत आहे.

शुक्रवारी सप्ताहाची सांगता झाली या निमित्ताने अन्नदान कार्यक्रम करण्यात आला यावेळी या महाप्रसादाचा पाच हजार लोकांनी लाभ घेतला.सप्ताह यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब हंगरगेकर,राजेश शिंदे,दिलीप मगर ,प्रभाकर कदम,निलेश रोचकरी,लक्ष्मण उळेकर,महेश गवळी,रामचंद्र यमगर,बाळूमामा गुरव, धन्यकुमार हिबारे,सरपंच विशाल सांगळे ,देविदास पांचाळ,नितीन जाधव यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top