उस्मानाबाद प्रतिनिधी
डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयात एन एस एस विभागा मार्फत विविध राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यात येतात . 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो त्याकरिता महाविद्यालयाने रक्तदान शिबीर हा उपक्रम राबवत साजरा केला . या प्रसंगी डॉ चंचला बोडके याना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले. त्यानी आपल्या भाषणात महिलांना आरोग्या विषयी जागरुक असण्याची आवश्यकता व्यक्त केली. डॉ. नितीन कुंभार यांनी महिला दिन साजरा करण्यामागचा इतिहास सांगत त्याचे भारतिय संविधानांशी असणारे नाते विषद केले. एन एस एस समन्वयक प्रा. इक्बाल शहा यांनी जळगाव येथे आव्हान या आपत्ती व्यवस्थापन शिबिरात प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थांची ओळख तसेच त्यांनी घेतलेले प्रशिक्षण याबाबतीत माहिती दिली.
विद्यार्थिनींचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व महिला प्रतिनिधींचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. रक्तदान शिबिरात विद्यार्थी प्राध्यापक यानी मिळुन रक्तदान केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ पूनम ताप्डीया यानी तर आभार प्रदर्शन प्रा. चांदणी घोगरे यानी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अंबेकर, प्रा. सोनाली पाटिल, प्रा. अजित शिंदे, प्रा.शिकारे, प्रा.मैंदर्कर व शिक्षकेतर कर्मचारी यानी परिश्रम घेतले.
