महिलांना समान संधी दिली तर देशाचं भवितव्य उज्वल - डॉ.साजेद चाऊस

mhcitynews
0

बिलाल कुरेशी 

महिलांच्या प्रश्नांची जाणीव निर्माण व्हायला समाजाला अनेक दशके जावे लागली परंतु आता महिला स्वावलंबी आणि संधी शोधण्याचा प्रयत्न करू लागली आहेत महिलांना जर समान संधी दिली तर देशाचे भवितव्य उज्वल होऊ शकेल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.साजेद चाऊस यांनी शिराढोण येथील शरदचंद्र महाविद्यालय येथे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात मत व्यक्त केले.


कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून के एन ज्युनियर कॉलेजच्या मराठी विभाग प्रमुख प्राध्यापिका अर्चना आरीकर या होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये महाविद्यालयाच्या उर्दू विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. पटेल एस.एम व प्रा. सय्यद एस एन या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मा जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. सदरील कार्यक्रमाच्या औचित्याने महाविद्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचा व परीक्षा कालावधीत कर्तव्यावर असलेल्या पोलीस दलातील महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सय्यद अमर तर आभार डॉ. फारूक तांबोळी यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top