पाण्यासाठी भाविकांची भटकंती

mhcitynews
0

नगरपरिषद प्रशासनाची डोळेझाक

सिद्दीक पटेल

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी देशातील विविध राज्यातून अनेक भाविक दररोज तुळजापुर येथे येत असतात. वाढत्या उन्हाच्या झळांनी भाविकांना देखील सामना करावा लागत आहे.

उन्हाळा सुरू होऊन महिना उलटला तरी पाणपोई ची व्यवस्था अद्याप करण्यात आलेली नाही. याबाबत भाविकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत नगरपरिषद प्रशासन व मंदिर संस्थान प्रशासन याबाबत पाणपोईची व्यवस्था करावी अशी भाविकांमधून मागणी करण्यात येत आहे. तर तालुक्यातील मुख्य ठिकाण असलेल्या तुळजापूर जुने बस स्थानकावर प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने प्रवाश्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तुळजापूर बसस्थानकावरून औरंगाबाद , हैद्राबाद ,नाशिक, पुणे या लांब पल्ल्याच्या बसमधील प्रवशांना पिण्याच्या पाण्यासाठी बसस्थानक परिसारातील हॉटेलमध्ये पाणी पाऊच, पाण्याची बॉटल चढ्या दराने विकत घ्यावे लागत आहे . सध्या कडक उन्हाळा असल्याने ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा बस स्थानकात उपलब्ध करून देण्याचे आगर प्रमुखांचे कर्तव्य असून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. बसस्थानक हे मध्यवर्ती ठिकाणी असून या ठिकाणी तालुक्यातील खेड्यापाड्यातील नागरिकांना रोज ये-जा करावी लागते. शहरातील भवानी रोड, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, बस्थानक परिसर या प्रमुख भागात आतापर्यंत एकाही पाणपोईचे नगरपरिषद च्या वतीने नियोजन केले नसल्याने भाविक व नागरिकांतून संताप व्यक्त केला जातं आहे.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top