तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सचिन पाटील यांची बुधवार दि 24 रोजी बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर आज शुक्रवार दिनांक 26 रोजी सभापती सचिन पाटील यांनी दुसऱ्यांदा पदभार स्वीकारला तर उपसभापती संतोष बोबडे यांनी ही पदभार स्वीकारला यावेळी सर्व संचालक मंडळ आणि मित्रपरिवारांनी त्यांचा भव्य सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पदभार स्विकारल्यानंतर सभापती पाटील बोलताना म्हणाले की, शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी सुविधा निर्माण करण्याचा आपला मानस असून शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल बाजार समितीच्या सभापती पदावर पुन्हा एकदा आपल्याला काम करण्याची संधी मिळाल्याने विकासाचे काम पुन्हा एकदा जोमाने हाती घेणार असल्याचे म्हणाले. यावेळी अनिल कांबळे, अस्मिताताई कांबळे, विक्रम देशमुख, दीपक आलुरे, विनोद गंगणे, सचिन रोचकरी, दत्ता राजमाने, प्रभाकर मुळे, अण्णा लोंढे, शांताराम पेंदे, आनंद कंदले, नागेश नाईक, अमर हंगरगेकर, औदुंबर कदम, गुलचंद व्यवहारे, दिनेश बागल, बाबा घोंगते, राम चोपदार, अनिल काळे, विजय शिंगाडे, निलेश रोचकरी, लखन पेंदे आदीसह मित्र परिवाराची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
