महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त डॉ. सोलापूरे सरांचे व्याख्यान

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

तुळजापूर येथील जंगम मठात दि. 23 रोजी महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त लातूर येथील प्रसिद्ध व्याख्याते डॉ. राजशेखर सोलापूरे सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

याप्रसंगी डॉ. राजशेखर सोलापूरे सर यांनी महात्मा बसवेश्वरांच्या कायक आणि दासोह सिद्धांताबद्दल सर्वांना माहिती दिली. बाराव्या शतकातीला थोर महात्मा ज्यांनी अनुभव मंटप या नावाने जगातील पहिली लोकशाही निर्माण केली. मानवता,स्त्री पुरुष समानता, वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबींचा आग्रह धरला. अशा पद्धतीचे महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याविषयी आपल्या व्याख्यानातून त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात शिवभजनाने झाली, तुळजापूर तालुक्यातील बारूळ आणि किलज येथील शिवभजनी मंडळाने मोठ्या उत्साहाने भजनं गायिली. त्यानंतर डॉ. सोलापूरे सरांचे व्याख्यान झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे कोषाध्यक्ष ॲड. ओम मस्के यांनी केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय सचिन उपासे करुन दिला.आभार प्रदर्शन समितीचे अध्यक्ष महेश नडमणे यांनी केले. व्याख्यानानंतर महाप्रसादाचे नियोजन केले होते. कार्यक्रमासाठी सर्व बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीने पुढाकार घेतला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top