जागतिक आरोग्य दिनानिमीत्त "सुंदर माझा दवाखाना" अभियानास सुरुवात

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

दिनांक 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. या निमीत्ताने महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने सुंदर माझा दवाखाना अभियान सुरू केले. या निमीत्ताने उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जागतिक आरोग्य दिनानिमीत्त रुग्णांची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांचा तुळजापूर येथील माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी, प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी यांच्या हस्ते गुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

यावेळेस उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीधर जाधव यांनी सुंदर माझा दवाखाना व जागतिक आरोग्य दिनानिमीत्त मार्गदर्शन करताना म्हणाले की, राज्य शासनाने 7 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत 'सुंदर माझा दवाखाना' अभियान राबवायचे असून यासाठी सर्व डॉक्टर व परिचारकाने आपला दवाखाना स्वच्छ व सुंदर ठेवायचा आहे जेणे करून रुग्णांना प्रसन्न वाटेल, याकरिता उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर हा उपक्रम आम्ही यशस्वी पार पाडून घेण्यासाठी परिश्रम करणार असल्याचे म्हंटले. 

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंजली गाटे, डॉक्टर प्रणिता गाडेकर, डॉक्टर अखिल राठोड, तसेच परिचारिका रेखा लोंढे, जे.बी.जाधव, उज्वला गावडे, वैशाली पेले, माधुरी माने, कदम, तांबे, रोकडे, अविनाश आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top