तुळजापूर प्रतिनिधी
दि. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले यांनी रुग्णांना फळे, बिस्कीट व पुष्प देऊन रुग्णांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विविध फळे व बिस्किट किट वाटप करून तसेच गुलाब पुष्प देऊन लवकर बरे व्हा अश्या शुभेच्छा रुग्णांना दिल्या, यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ.श्रीधर जाधव सर, डॉ.श्रीराम नरवडे, अमित मोगरकर, सर्व परिचारिका, परिचारक व सहकारी बांधव उपस्थित होते.
