तुळजापूर प्रतिनिधी
येथील हनुमान नगर येथे हनुमान जयंती निमित्त दिनांक 6 एप्रिल गुरुवार रोजी अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे मंहत मावजीनाथ महाराजांच्या शुभहस्ते गाथा पुजनाने सुरुवात झाली. यावेळी माजी नगरसेवक अमर मगर, विशाल रोचकरी, तहसीलदार सौदागर तांदळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यानंतर दीप, कलश, व्यासपीठ, टाळ, वीणा, मृदंग, ज्ञानेश्वरी, प्रतिमा, तुळस आणि ध्वज पूजन हे येथील रहिवाशी आणि सोहळा कमिटी सदस्याच्या हातून करण्यात आले . त्यानंतर मोठ्या भक्ती भावाने विठ्ठल नामाचा गजर करत टाळ मृदंग विना यांच्या वाद्याने संपूर्ण हनुमान नगरी भक्तीमय झाली याप्रसंगी रहिवाशांची मोठी गर्दी होती.
