फसवणूक ; मजूर पुरवीतो म्हणत साडेचार लाखाला काठी

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

ऊस गळीत हंगामासाठी ऊस तोडणी कामगार पुरवतो म्हणून देवसिंगा तूळ येथील राजकुमार जनार्धन जाधव यांच्याकडून साडेचार लाख रुपये घेऊन, ऊसतोड कामगार न पुरवता जाधव यांची फसवणूक केल्याप्रकरणी लोभा तांडा, मुखेड येथील एका विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील देवसिंगा तुळ, येथील- राजकुमार जनार्धन जाधव यांनी ऊसतोड मजूर पुरवण्याचा करार  दि. 31.05.2013 रोजी 12.30 वा. सु.  विश्वनाथ कॉर्नर जवळील हॉटेल मध्ये तुळजापूर येथे लोभा तांडा, ता मुखेड येथील- विनोद गोपीनाथ चव्हाण यांच्याशी केला होता. त्यापोटी राजकुमार यांच्याकडून रोख स्वरुपात एकुण 4,50,000 ₹ रक्कम दि. 31.08.2023 रोजी पावेतो घेवून राजकुमार यांना पैसाचे बदल्यात ऊसतोड मजूर न पुरवीता व घेतलेली नमूद रक्कमही परत न करता राजकुमार यांची आर्थिक फसवणकू केली. अशा मजकुराच्या राजकुमार जाधव यांनी दि. 02.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 406,  420 अंतर्गत तुळजापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top