प्रतिनिधी रजाक शेख
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या मार्च 2023 मधील दहावीच्या परीक्षेत वसंतराव पाटील प्रशाला नांदुरी ची विद्यार्थिनी कुमारी सानिया रजाक शेख याने 87% गुण घेऊन यश प्रशालेत दुसरा क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे.
सानिया हिने दहावीला कोणत्याही कोचिंग क्लास न करता घरी आई वडिलांना शेतामध्ये काम करण्यास मदत करत अभ्यास करून तब्बल 87 टक्के गुण मिळवतील संपादन केले तिचे सर्व स्तरातून कौतुक व शुभेच्छा वर्षाव होत आहे.कुटुंबातील मामा मामी आणि मावशी यांच्या वतीने सानियाचा पुष्प हार आणि गुच्छ देऊन सत्कार करीत पुढील शैक्षनिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सानिया पत्रकार रजाक शेख यांची कन्या आहे.
