आई तुळजाभवानीनं शक्ती दिल्यास लवकरच मंत्रिमंडळ विस्तार - फडणवीस

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी

आमदार राणादादा पाटील यांना मंत्रीपद मिळावं यासाठी देखील साकडं घातलं जातंय या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सावधपणे उत्तर देत. "आई तुळजाभवानीने शक्ती दिली तर लवकरच विस्तार होईल", असे विधान आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन पत्रकारांशी संभाषण करताना म्हणाले.

तत्पूर्वी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे विधिवत पुजा करुन दर्शन घेतले. दुपारी सव्वादोन च्या दरम्यान उपमुख्यमंत्री यांचे हेलिकॉप्टरने तुळजापूर मध्ये आगमन झाले. त्यानंतर भवानी रोड मार्गे सुवर्णेश्वर मंदिरापर्यंत उपमुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा आला. सुवर्णेश्वर मंदिरापासून भवानी मंदिरापर्यंत पायी चालत तुतारी संबळाच्या वाद्यात मंदिरात उपमुख्यमंत्र्यांनी मंदिरात प्रवेश केला यावेळी भाजप कार्यकर्ते पदाधिकारी शहरवासीयांनी मोठी गर्दी केली होती गर्दीतून वाट काढत उपमुख्यमंत्री यांनी मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करताना पोलीस प्रशासन आणि मंदिर संस्थांच्या वतीने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top